गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबद्दल जोरदार चर्चा चालू आहे . दोघे एकमेकांपासून विभक्त होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र या सगळ्या चर्चांबाबत सिद्धार्थ-तृप्तीने संयम आणि शांतीचा नियम पाळला होता . सिध्दार्थ ने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मध्ये मुलगी स्वराचा वाढदिवस सिद्धार्थ-तृप्तीने एकत्र साजरा केल्याचे दिसत आहे. त्यातसिद्धार्थने आपली मुलगी ईराचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तृप्ती देखील दिसत आहे.
सिध्दार्थच्या सिनेमाबद
सिद्धार्थ सध्या ‘तमाशा LIVE’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शिवाय ‘दे धक्का २’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे ‘तमाशा LIVE’साठी तर त्याने चक्क गाणं गायलं आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी खरंच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात.
प्रियांकाकडून नवा होमवेयर ब्रँड
“सिद्धार्थ जाधव ईरासोबत त्याच्या तमाशा live मधील गाणं एण्जॉय करताना दिसत आहे. बापलेकीची मज्जा.” असं कॅप्शन देखील सिद्धार्थने हा व्हिडीओ शेअर करताना टाकलं आहे .सिद्धार्थचं त्याच्या मुलींवर प्रचंड प्रेम आहे. आपल्या दोन्ही मुलींबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.