ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कथित दारू घोटाळय़ातील आरोपी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सिसोदिया 3 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत.
दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारू उत्पादकांसाठी नियमावली लीक करण्यात आली. तसेच दारू उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोपही सिसोदिया यांच्यावर सीबीआयचा आरोप आहे. सिसोदिया यांना या प्रकरणात तपासात सहकार्य न केल्यामुळे 26 फेब्रुवारीला 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने अटक केली होती. सिसोदिया ईडीच्या कोठडीत होते. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली.
अधिक वाचा : राऊतांना ‘ते’ ट्विट भोवलं; बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल