Sourav Ganguly News : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान खेळाडू सौरव गांगुली याला त्रिपुराचा पर्यटन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आल्याची माहिती त्रिपुराचे पर्यटन मंत्री सुशांत चौधरी यांनी दिली.सौरव गांगुली यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोलकाता येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे त्यांनी ट्विट करत माहिती दिली.यावर मुख्यमंत्री माणिक साहा यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सौरव गांगुलीला ब्रँड अॅम्बेसेडरचा प्रस्ताव दिला त्यावेळी त्याने होकार दिला.सध्या गांगुली लंडनमध्ये आहे. तिकडून आल्यानंतर तो त्रिपुरा सरकारसोबत करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माणिक साहा ट्विटमध्ये काय म्हणाले
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने त्रिपुरा पर्यटनाचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचा आमचा प्रस्ताव स्वीकारली आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे.आज त्यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाले.”मला खात्री आहे की सौरव गांगुलीच्या सहभागामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नक्कीच चालना मिळेल.
Previous Articleन्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालयाचा १००% निकाल
Related Posts
Add A Comment