विविध मार्गांवर 80 जादा बसेस : प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे जादा बस सोडण्याचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या शुक्रवार दि. 21 पासून विविध मार्गांवर विशेष अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. बेंगळूर, मंगळूर, हैदराबाद, पुणे, मुंबई, गोवा यासह इतर प्रमुख शहरांकडे अतिरिक्त 80 बस धावणार आहेत. दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन परिवहनने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवार दि. 21 रोजी वसुबारस, शनिवार 22 रोजी धनत्रयोदशी, रविवार दि. 23 रोजी साप्ताहिक सुटी, सोमवार दि. 24 रोजी नरक चतुर्दशी, तर बुधवार दि. 26 रोजी पाडवा व भाऊबीज असल्याने सलग सुटय़ा आहेत. त्यामुळे या काळात मूळगावी परतणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. दरम्यान प्रवाशांच्या सोयीखातर याकाळात मध्यवर्ती बसस्थानकातून विविध शहरांकडे अतिरिक्त बस धावणार आहेत.
21 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुटीसाठी मुंबई, पुणे, पणजी, बेंगळूर, नाशिक, मंगळूर, हैदराबाद आणि गोव्याहून आदी लांब पल्ल्याहून येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. वाढती संख्या लक्षात घेऊन परिवहनने बसफेऱया वाढविल्या आहेत. प्रवाशांना www.ksrtc.karnataka.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन बुंिकंग करता येणार आहे.
घर बसल्या बुकिंगची व्यवस्था
परिवहनने प्रवाशांच्या सोयीखातर मोबाईल ऍप विकसित केला आहे. ksrtc mobile app या नावाने प्ले स्टोअरमधून हा ऍप डाऊनलोड करून प्रवासी ऑनलाईन बुकिंग करू शकतात. घरबसल्या प्रवाशांना आगाऊ तिकीट बुकिंग करणे यामुळे सोयिस्कर होणार आहे.
येत्या शुक्रवारपासून अतिरिक्त बस धावणार
दिवाळीसाठी येत्या शुक्रवारपासून विविध शहरांकडे अतिरिक्त बस धावणार आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही बससेवा पुरविली जाणार आहे. राज्यातील प्रमुख शहराबरोबर मुंबई, पुणे आणि गोव्यालाही जादा बस सोडल्या जाणार आहेत.
– के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)