अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा राज्यात प्रवेश करून नऊ दिवस पूर्ण झाले असून रविवारी दुसऱया दिवशी तुमकूर जिल्हय़ात उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांच्या जन्मगावी चिक्कनायकनहळ्ळी शहरात आयोजित कनक जयंती कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी महषी वाल्मिकी यांच्या फोटोचे पूजन करून आदरांजली वाहिली.
तुरुवेकेरे तालुक्मयातील शाळेत वास्तव्यास असलेले राहुल गांधी सकाळी 6.30 वाजता कारने तिपटूर तालुक्मयातील के. बी. क्रॉस येथे पोहोचले. याठिकाणी पोहोचल्यावर भारत जोडो यात्रेचे पूर्णकुंभ कलशाने स्वागत करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. के. बी. क्रॉसहून सकाळी 6.40 वाजता प्रारंभ झालेल्या भारत जोडो पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वेणूगोपाल, डॉ. जी. परमेश्वर, बी. के. हरिप्रसाद, आर. राजेंद्र, डॉ. रफिक अहमद यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
भारत जोडो यात्रा निघालेल्या चिक्कनायकनहळ्ळीसह केबी क्रॉसपासून रस्त्याच्या दुतर्फा काँग्रेस पक्षाचे झेंडे व फलक फडकत असल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आणखी उधाण आले होते. कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांच्या जन्मगावी सकाळी 8.15 वाजता भारत जोडो पदयात्रा पोहोचली. यानंतर 10 वाजता चिक्कनायकनहळ्ळीच्या कनक सर्कलमध्ये आयोजित महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात राहुल गांधीनी सहभागी होऊन फोटोचे पूजन केले. यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी शेतकऱयांसह प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सायंकाळी 4 नंतर पुन्हा यात्रेला सुरुवात होऊन सायंकाळी बरकनाळू गेटजवळ त्यांनी विश्रांती घेतली.