प्रवाशांत भीती, बसवाहतुकीला अडथळा, बंदोबस्ताची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
सतत हजारो प्रवाशांनी गजबजणाऱया बसस्थानकात कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांना भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे. कुत्र्यांचे कळप बसस्थानकात ठाण मांडून बसत असल्याने बसचालकांनाही समस्या निर्माण होत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी व बसचालकांतून होत आहे.
शहरात भटक्मया कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे. नागरी वस्तीबरोबर मोकळय़ा जागेत कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आबालवृद्धांना बाहेर फिरणेही धोक्मयाचे बनत आहे. मनपामार्फत कुत्र्यांना पकडून नसबंदी मोहीम राबविली जात आहे. मात्र दरवषी कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाला भटकी कुत्री आता डोकेदुखी ठरू लागली आहेत. बसस्थानकातील कचऱयावर ताव मारण्यासाठी कुत्र्यांचा कळप फिरत आहे. दरम्यान कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
बसस्थानकाच्या आवारात कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने बस वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. जागोजागी कुत्री बसत असल्याने प्रवाशांना ये-जा करणे धोक्मयाचे बनत आहे. दरम्यान काही कुत्री बससमोर किंवा बसखाली आसरा घेत आहेत. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे. परिणामी वाढत्या कुत्र्यांमुळे प्रवाशांबरोबर बसचालकही हैराण झाले आहेत. बसस्थानकातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.