दोन तासांमध्ये झाली 150 युनिट्सची विक्री
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता चालू वर्षात 1.22 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. हा आकडा पाहता काही लक्झरी ब्रँड भारतामध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार सादर करत आहेत. 26 जुलै रोजी वोल्वो इंडिया यांनी भारतामध्ये तयार केलेली नवीन एक्ससी 40 ही रिचार्ज इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केली असून कंपनीने 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बुकिंग आपल्या कार्यालयीन वेबसाईटवर सुरु केले आहे.
दोन तासांमध्येच सर्व युनिटची विक्री
बुकिंग सुरु करण्यात आल्यानंतर दोन तासांच्या कालावधीमध्ये सदरच्या मॉडेलची सर्व विक्री झाली आहे. भारतीय बाजारात वोल्वो एक्ससी 40 रिचार्जच्या सर्व म्हणजे 150 युनिट्सची दोन तासांमध्ये विक्री करण्यात आली आहे. या कारची डिलीव्हरी ही चालू वर्षातील ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे.
अन्य ठळक नोंदी
- वोल्वो एक्ससी40 रिचार्जची किंमत 55.90 लाखांपासून
- भारतात जोडणी होणारे पहिले लक्झरी इलेक्ट्रिक वाहन
- कर्नाटकातील बेंगळूरजवळच्या प्रकल्पात निर्मिती
- टॉप स्पीड 180 किमी प्रति तास
- 40 मिनिटात होणार 80 टक्के चार्ज