आमदार मायकल लोबो यांची माहिती : टुगेदर फॉर कळंगूट पॅनल पुन्हा सक्रिय : विकासासाठी मोठय़ा आघाडीने विजयी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / म्हापसा
गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही माजी सरपंच शॉन मार्टिन्स यांच्या नेतृत्वाखाली टुगेदर फॉर कळंगुटच्या पॅनलखाली 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकाऱयांकडे सादर केले आहेत. यावेळी गटात काही नवीन उमेदवारांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात सत्ताधारी टुगेदर फॉर कळंगूट पॅनलने चांगले कार्य केलेले आहे. युवा पिढीसाठी काम केले आहे. क्रिकेटसह इतर खेळ, मुलांसाठी खोब्रावाडा येथे चिडर्न पार्क, नाईकवाडा जॉगर ट्रक पूर्ण केले. पंचायत सदस्यांनी विकासाबाबत याकाळात चांगले योगदान देऊन विकास साधल्याची माहिती कळंगुटचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी दिली.
बार्देश मामलेदार कचेरीसमोर आपल्या पॅनलमधील अकराही उमेदवारांसमवेत आमदार लोबो उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला गेल्या पाच वर्षात पंचायतीच्यामध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घरात लघू उद्योग सुरू करण्यास सहकार्य केले आहे मग तो छोटा गाळा असो, छोटा व्यवसाय, रस आम्लेट स्टॉल, क्रीडा स्पर्धामध्ये, वॉटर स्पोर्ट्स, रेन्ट अ कार, बाईक आदी व्यवसयांसाठी प्रोत्साहन दिले. त्यांना जागा उपलब्ध करून दिली, मंजुरी देऊन सर्वांना स्थानिकांना आम्ही मदत केली आहे. त्यासाठी कळंगूटवासियांनी टुगेदर फॉर कळंगूट या पॅनलला मदत करून निवडून आणा, असे आवाहन आमदार मायकल लोबो यांनी केले.
साळगाव ते कळंगूट रस्ता देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्णत्वाकडे नेले. पदपथ काम सुरू होणार, सौंदर्यीकरण होणार आहे. हॉटमिक्स रस्ते दिले. शेतकरी, शिक्षण क्षेत्रात खासगी रेस्टॉरंट, शॅक मालकांना आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सर्वांनी टुगेदर फॉर कळंगुटला पाठिंबा देऊन विजयी कारवे, असेही लोबो म्हणाले.
कार्यतत्पर उमदेवारांनाच जनता निवडून देणार
पंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा लोक विचार करत नाहीत. आपल्या कामे होण्याच्या दृष्टीने लोक मतदान करतात. रात्री अपरात्री आकस्मिक प्रसंगाला धावून येणाऱया उमेदवारालाच लोक मतदान करतात. गेल्या पाच वर्षात लोकांनी आमची व पंच सदस्यांची विकास कामे पाहिली आहेत. ज्यांनी आजवर कुणालाही त्रास दिलेला नाही. अशाच प्रकारे पंचायत क्षेत्राचा विकास केला जाईल, असे आमदार लोबो म्हणाले.
चांगली सेवा दिलेल्या पॅनलला पुन्हा संधी द्या : शॉन मार्टिन्स
कळंगुटचे माजी सरपंच शॉन मार्टीन्स म्हणाले की, गेल्यावेळी कळंगूट वासियांनी आम्हाला टुगेदर फॉर कळंगुटच्या पॅनलखाली निवडून आणले होते. या पाच वर्षांत आम्ही बरीच कामे हाती घेतली त्यात कळंगूट मार्केटचा समावेश आहे. चिल्ड्रन, पार्किंग ट्रक गटार, पाथवे स्ट्रीट ट्रक्टर, शेतकऱयांना मोफत खत वाटप. आमच्या कामाचा प्रगती अहवाल सर्वांसमोर आहे. त्या आधारावरच आम्ही पुन्हा एकत्रित आलो आहोत. आमदारांच्या सहकार्याने एका छताखाली पाच वर्षे सेवा देणाऱया या पॅनलला पुन्हा निवडून द्या असे आवाहन मार्टिन्स यांनी केले.