क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या कडोली विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धेत शिवाजी हायस्कूल कडोली स्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या क्रीडा स्पर्धेत शिवाजी हायस्कूल कडोलीच्या मुलींच्या खोखो संघाने व थ्रोबॉल संघाने विजेतेपद, निर्मळा तळवार हिने 800 मी. धावण्याच्या स्पर्धत प्रथम, प्राजक्ता पाटीलने द्वितीय, कराटे स्पर्धेत वैदही पाटीलने विजेतेपद, योगा स्पर्धेत वैजंता पाटील व सुचिता पाटील यांनी विजेतेपद तर 14 वर्षाखालील गटात अनुराधा मरगाळे हिने 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, अंजली मानमोरे हिने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, श्रद्धा कासार हिने 400 व 600 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर वेटलिंफ्टिंगमध्ये शारदा पाटील, श्रद्धा कासार, समिक्षा मानमोडे, वेदीका कर्लेकर, व श्वेता पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
मुलांच्या गटात मुलांच्या खो-खो, फुटबॉल व 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत विजेतेपद तर कब्बड्डी स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. वैयक्तिक स्पर्धेत दक्ष पाटीलने 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, कुणाल चौगुलेने 1500 मी. धावण्याच्या तर साहील चौगुलेने 3 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक, बुद्धीबळ स्पर्धेत लखन राजाई व रोनीत मुरकुटे यांनी विजेतेपद पटकाविले. 14 वर्षाखालील गटात सिद्धार्थ रूटकुटेने 100 व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, किसन चौगुलेने 400 व 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर नागेश अनगोळकरने गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
वेटलिफ्टिंगमध्ये नागेश, समर्थ, आदर्श व ज्ञानेश्वर यांनी आपल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविले. या सर्व खेळाडूंना शिवाजी हायस्कुल कडोलीचे क्रीडा शिक्षक एन. आर पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक व इतर शिक्षकांचे प्रोत्साहन लाभत आहे.