वृत्तसंस्था /अमृतसर
पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने एका मीडिया ग्रुपचे मुखपत्र असलेल्या ज्येष्ठ पत्रकार बर्जिंदर सिंग हमदर्द यांना समन्स बजावले आहे. जालंधरपासून 18 किमी अंतरावर असलेल्या जंग-ए-आझादी स्मारकाच्या बांधकामासाठी निधीच्या वापराबाबत सुरू असलेल्या चौकशीसाठी त्यांना 29 मे रोजी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार बरजिंदर सिंग हमदर्द यांना समन्स बजावल्यानंतर विरोधी पक्षांनी आम आदमी पार्टी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुऊवात केली आहे. जंग-ए-आझादी हे स्मारक भाजप-अकाली सरकारच्या काळात बांधण्यात आले असून माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट होता. या प्रकल्पाबाबत दक्षता ब्युरो जालंधर परिक्षेत्राने यावषी मार्च महिन्यात चौकशी सुरू केली होती. हा प्रकल्प करताना निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार आहे. त्यासाठी व्यवस्थापन समितीचे सचिव लखविंदर सिंग जोहल यांनाही काही काळापूर्वी बोलावण्यात आले होते. या प्रकल्पाचे बजेट 315 कोटी ऊपये होते. या तपासणीत 2014-2016 मध्ये बांधकाम सुरू असताना किती पैसे पास झाले, पैसे कसे आणि कुठे वापरले गेले, याबाबत दक्षता ब्युरो चौकशी करत आहे.