महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता खंडपीठासमोर होणार आहे. त्यानंतर धनुष्यबाण कोणाकडे असणार हे समजणार आहे. आज कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर राजकीय वर्तुळातून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान कोल्हापूरातून संजय पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून निर्णय आमच्या बाजूनेच होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कायद्याचा अभ्यास केला. तज्ञांची मते तपासली, अनेकांची व्याख्याने एेकली तर अस लक्षात येतं की ५६ वर्षाचा पक्ष महत्त्वाचा कि ५६ दिवसांचा गट महत्त्वाचा. म्हणूनच धनुष्यबाण शिवसेनेकडेचं राहणार आणि शिवसेना पक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडेच राहणार असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केला. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. निर्णय आमच्या बाजूनेच होणार.
Previous Articleहातकंणगले मतदार संघात भाजपला ताकद देणार
Next Article खानापूर येथील १६ शेतकऱ्यांची २० लाखांची फसवणूक
Related Posts
Add A Comment