मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना परतीचे आवाहन केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. मला उध्दव ठाकरेंचा अभिमान वाटतो. आज बाळासाहेबांची आठवण येतेयं. सेना कुटुंबासारखी राहिली आणि राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकित मुख्यमंत्री राजीनामा देणार काय? तसेच सरकार बरखास्तीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्राती सध्य परिस्थितीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात दडपशाहीचं सरकार नव्हत आणि नसेल. कुटुंबात भांड्याला भांड लागताचं. यावर बसून चर्चा केली पाहिजे. केवळ टि.व्हि वर बोलणे म्हणजे सर्व काही होत नाही. चर्चेतून मार्ग निघतो. चर्चा झालीचं पाहिजे. सत्ता येते जाते मात्र नाती ही कायमस्वरुपी राहतात. आज उध्दवजींनी जे आवाहन केलं आहे ते एका मोठ्या भावासारखं केलं आहे. जे सर्वात पुढे बोलत आहेत ते पहिला राष्ट्रवादीत होते हे विसरुन चालणार नाही. खाल्या मिठाला जागायची महाराष्ट्राची संस्कृती आहे. मुख्यमंत्री जर मोठ्या भावासारखं सगळ पोटात घेत आहेत तर बंडखोरांनी येऊन चर्चा करावी असेही त्या म्हणाल्या.
Trending
- सोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक
- गृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार
- मध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’
- हरिभजनाविण काळ घालवू नको रे
- रिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी
- महिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा
- 2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली
- ‘असूर 2’चा ट्रेलर प्रदर्शित