ॲड. शैलेश गावस यांची मागणी : डीजीपींकडे तक्रार दाखल
प्रतिनिधी / पणजी
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला आणि आपले खरे दात दाखवायला सुऊवात केली आहे. काँग्रेसच्या विजेत्या उमेदवाराचा जयजयकार करताना त्यांनी ‘इडली सांबर अच्छा है, गोवावाला लुच्चा है’ अशा घोषणा देऊन गोमंतकीयांच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न केला आहे. घोषणा देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गोव्यातील काही सुजाण नागरिकांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार आर. व्ही. देशपांडे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे अॅङ शैलेश गावस यांनी सांगितले. तक्रार दाखल केल्यानंतर येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शैलेश गावस बोलत होते. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत कोण विजेते झाले त्यांचा जयजयकार करणे स्वाभाविक आहे. मात्र गोवावाला लुच्चा कसा आहे, असा प्रश्न गावस यांनी उपस्थित केला आहे. एक प्रकारे गोव्याच्या लोकांना शिवी दिल्यासारखी असून त्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाणार असून त्यासाठी सर्वतोपरीने आपण प्रयत्न कराणार. असेही शैलेश गावस म्हणाले. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी एकमेकांची उणीदुणीवर काढली त्याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र समस्त गोमंतकीयांना लुच्चा म्हणून हिणविणे हे गैर आहे. गोमंतकीय जनेचा अपमान करणाऱ्या आर. व्ही देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी शैलेश तिवरेकर यांनी केली आहे. आता पोलीस महासंचालकांना तक्रार देण्यात आली आहे. कदाचीत घडलेले प्रकरण हे गोवा पोलिसांच्या हद्दीत नसल्याने कारवाई होणार नाही. तसेच झाल्यास प्रकरण न्यायालयात घेऊन जाईन आणि संबंधीत व्यक्तीवर कारवाई करण्यास भाग पाडेन असेही शैलेश गावस म्हणाले.