वडिलांची मागणी, पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून शिंदोळी येथील एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱयांवर कारवाई करण्यात पोलीस दिरंगाई करत आहेत, असा आरोप त्या विवाहितेच्या वडिलांनी केला आहे.
अनिता रमेश लोहार (वय 22, रा. शिंदोळी) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. 6 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली होती. यासंबंधी अनिताचे वडील मधुकर सुतार (रा. नावगे) यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद दिली होती.
सुरुवातीपासूनच मारिहाळ पोलीस आपल्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱयांवर कारवाई करण्यास दिरंगाई करीत आहेत. पती रमेश लोहार, सासरे अशोक लोहार या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना अद्याप अटक झाली नाही, असा आरोप अनिताच्या वडिलांनी केला आहे.
हुंडय़ासाठी अनिताचा छळ केला जात होता. पती, सासू, सासरे, नणंद व तिच्या पतीच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलीने आपले जीवन संपविले आहे. घटना घडली त्याचदिवशी आपण जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱहाणे मांडले होते. तीन वर्षांपूर्वी अनिताने प्रेमविवाह केला होता. तिला एक मुलगाही आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी मधुकर सुतार यांनी केली आहे.