हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. याशिवाय थंडीचा परिणाम केसांवरही जाणवू लागतो.हवेतील गारव्यामुळे केस कोरडे होणे ,केस गळणे अशा समस्या निर्माण होतात.तसेच केसांची चमकही जाते.अशावेळी केसांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.आज आपण हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी आपल्या डोक्याचं रक्ताभिसरण वाढणं गरजेचे असते. यासाठी हिवाळ्यात ड्रायफ्रुटस खावेत. यातील पोषक तत्त्वांमुळे केसांचे आरोग्य सुधारते.
केसांना तेल लावणे देखील खूप महत्वाचे आहे. हे केवळ रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करत नाही तर केसांना पोषण देखील देते.यामुळे हिवाळ्यात आठवड्यातून २ ते ३ वेळा तेलाने मसाज करावा. यासाठी खोबरेल तेल, बदाम तेलाचा वापर करावा.
हिवाळ्यात बऱ्याच जणांना कोंड्याची समस्या जाणवते. केसातील कोंड्यावर कोरफडीचा रस गुणकारी ठरतो. अंघोळीच्या आधी कोरफड किंवा लिंबाचा रस केसांना लावल्याने कोंडा निघून जातो.
कितीही थंडी असली तरी केस हे कोमट पाण्यानेच धुवावेत. कारण केस धुण्यासाठी गरम पाणी वापरल्याने केस कमकुवत होतात.
केस धुताना सौम्य शाम्पू वापरा ज्यामध्ये रसायने नसतात. त्यात सल्फेट नसावे.
ओले केस कधीही बांधू नये कारण त्यामुळे केस तुटतात.
हिवाळ्यात केसांचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी आहारात ताजी फळे, भाज्या मोड आलेली कडधान्ये ,दूध चिकन मासे यांचा समावेश असावा.
मग या हिवाळ्यात त्वचेसोबत केसांचीही काळजी घ्या.
Trending
- वाघोली तलाठी कार्यालयातील मतदनीसांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
- कोल्हापुरातील दगडफेकीचा ग्रामीण भागात निषेध; गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा आणि सांगरूळात कडकडीत बंद
- ‘बिद्री’वर प्रशासक आणणार नसल्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही
- जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका घटनेनुसार
- शहरातील परिस्थिती नियंत्रणात : शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
- कोल्हापुरातील दगडफेकीवरून वातावरण तापलं ; विरोधीपक्षातील ‘त्या’ नेत्याच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांचा घणाघात
- कोल्हापुरातील दंगलीचा पालकमंत्री घेणारा आढावा, पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
- ओडिशा अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी सोनू सूदचा मदतीचा हात!