Kolhapur Crime : कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी याठिकाणी विद्यार्थिनीना अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या शिक्षकावर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. शाळेतील मुख्याध्यापक फिर्यादी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी संबधित शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.व्ही. पी बागडी असं संशयित आरोपीचे नाव आहे. इंग्रजीच विषयाचा शिक्षक असलेल्या विकृत बांगडीने शाळेतील नववी आणि दहावीच्या मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवला.यानंतर या शिक्षकाची साताऱ्यामध्ये बदली करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांमधून तसेच पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून केली जात आहे. माध्यमांनी या प्रकरणाला तोंड फोडल्यानंतर पोलीस प्रशासन आणि शाळा प्रशासन देखील जागे झाले आहे. मात्र आतापर्यंत शाळा प्रशासनाने हे प्रकरण लपवून का ठेवले हा देखील प्रश्न केला जातोय.
Previous Articleश्री वनदेवी – मुकोबा देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा शनिवारपासून
Related Posts
Add A Comment