राष्ट्रिय राजकारणात येऊ पहात असलेला तेलंगणातील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) ची तेलंगणाबाहेर पहिली सभा पार पडली. महाराष्ट्रातील नांदेड येथे जाहीर सभा घेऊन बीआरएसने तेलंगणाबाहेर ( Telangna ) पहिल्यांदाच वाटचालीस सुरवात केली. नांदेड (Nanded) येथील सभेत बीआरएस पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KSR) यांच्या उपस्थितीत अनेक स्थानिक नेत्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.
अभुतपुर्व गर्दी असलेल्या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री राव यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आपली क्षमता सिद्ध करावी लागेल. त्यासाठी बीआरएसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘अब कि बार…किसान सरकार’ (Ab ki baar….Kisan Sarkar) असा नारा देऊन शेतकऱ्यांनी आपले कायदे बनवायला शिकले पाहीजे असे म्हणताना “सगळ्या पक्षांना आणि नेत्यांना महाराष्ट्रातील मतदारांनी पाठिंबा दिला आहे. यावेळेला बीआरएसला पाठींबा देऊन सुरू केलेल्या ‘अब की बार, किसान सरकार’या मोहीमेत सहभागी व्हा” असे आवाहन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आपल्या देशात नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता नाही. पण सत्ताधाऱ्यांमध्ये इच्छाशक्ती आणि शेतऱ्यांविषयीच्या बांधिलकीची कमतरता आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटूनही शेतकरी आत्महत्या का थांबल्या नाहीत ? तसेच त्यांच्या उत्पादनाला आधारभूत किंमत का मिळत नाही.?”असा सवाल केला. तेलंगणातील लोकांना दिल्या जाणाऱ्या सर्व कल्याणकारी आणि विकास योजना दोन वर्षांत लागू करण्याचे आश्वासन चंद्रशेखर राव यांनी दिले आहे.
Related Posts
Add A Comment