सुनिता सावंत, धर्मेश आंगले, नेल्सन आल्बुकेर्क यांचा समावेश
प्रतिनिधी /पणजी
गोवा लोकसेवा शिफारसीनुसार गोवा पोलीस खात्यात दहा उपअधीक्षकांना अधीक्षकपदी बढती देण्यात आली असल्याचा आदेश काल सोमवारी जारी करण्यात आला आहे. बढती मिळालेल्या अधीक्षकांनी त्वरित सोपस्कार पूर्ण करावे, असे आदेशात म्हटले आहे.
अधीक्षकपदी बढती मिळालेल्या उपअधीक्षकांमध्ये मारिया मोन्सेरात, गुरुदास गावडे, नेल्सन आल्बुकेर्क, सुचिता देसाई, एझिल्डा डिसोझा, सुनिता सावंत, धर्मेश पै आंगले, किरण पौडवाल यांचा समावेश आहे.