रायबाग – रायबागच्या गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील प्रवास करत असलेल्या कारचा अचानक टायर फुटला त्यामुळे कार पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रायबाग तालुक्यातील हुब्बरवाडी मंगसुळी -लक्ष्मेश्वर महामार्गावर घडली. एअरबॅग सुटल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी कार उलटली. त्यामधे प्रवास करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी दुसऱ्या वाहनातून बेळगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ते त्यांच्या कार्यालयातून हुक्केरी येथे जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending
- मुगाच्या डाळीचे खमंग थालीपीठ
- Kokan : चाकरमानी परतीच्या प्रवासाला, रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी
- सांगली: प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत अंडी फेक, अंडी फिरकवणाऱ्यांना दिला चोप
- पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, महिला जखमी
- Kolhapur : कळंब्यात पर्यावरणपूरक गणपती विसर्जन, चौदाव्या वर्षीही परंपरा कायम
- जीजीपीएस गुरूकुल प्रमुख किरण दत्तात्रय जोशी यांचे निधन
- गणेशाचा विसरलेला चांदीचा मुकूट केला मुर्तीकार अन् मनपा कर्मचाऱ्याने परत
- संसदेच्या नवीन बांधकामात गोकुळ शिरगाव एमआयडीसीतून कॉलमच्या मोल्डचा पुरवठा