स्वतःचे एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या घराकरता तो दिवसरात्र मेहनत करत असो. परंतु महागाईमुळे घरासाठीचा घर वाढत चालला आहे. अशा स्थितीत केवळ एक युरो म्हणजेच 88 रुपयांमध्ये बंगला खरेदी करता येणार आहे. ही ऑफर एका देशाच्या सरकारनेच दिली आहे.
हा बंगला इटलीच्या सेंट एलिया या सुंदर शहरामध्ये आहे. ही ऑफर प्रसिद्ध होताच लोकांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली. लोक प्रक्रियेबद्दल विचारणा करत लवकरात लवकर बंगला खरेदी करू इच्छित आहेत. विदेशी नागरिकाने या घरांच्या खरेदीसाठी अर्ज केल्यास त्याला प्राथमिकता दिली जाणार आहे. आतापर्यंत कॅनडा आणि अमेरिकेच्या नागरिकांनी याकरता स्वारस्य दाखविले आहे. अर्ज प्राप्त झाल्यावर ड्रॉ काढला जाणार असल्याचे शहराच्या महापौरांनी सांगितले आहे.

लवकर अर्ज करावा लागणार
शहरात आता केवळ 8 बंगले विक्रीसाठी उपलब्ध आहेत, जर तुम्हाला हे खरेदी करायचे असतील तर लवकर अर्ज करावा लागणर असल्याचे महापौर बियाजियो फैएला यांनी म्हटले आहे. या शहरातील सर्व घरं आता कमकुवत झाली आहेत, तसेच शहरातील लोक अन्यत्र स्थलांतर करत आहेत. 2014 साली या शहरात 2004 लोकांचे वास्तवय होते, परंतु आता हे प्रमाण केवळ 1,680 वर आले आहे. या शहरात सर्व सुविधा असूनही येथून लोक स्थलांतर करू पाहत असल्याने प्रशासनाला ही ऑफर द्यावी लागली आहे.
तीन वर्षांमध्ये होणार दुरुस्ती
या जुन्या घरांची दुरुस्ती करण्याची योजना शहर प्रशासनाने आखली आहे. तीन वर्षांमध्ये या घरांना पूर्णपणे नवे रुप दिले जाणार आहे. याकरता घर खरेदी करणाऱया व्यक्तीला 5 हजार युरो म्हणजेच 4.37 लाख रुपये स्थानिक प्रशासनाकडे जमा करावे लागणार आहेत. या रकमेकतून या घरांची पुनउ&भारणी केली जाणार आहे. घर खरेदी करणाऱयाला 6 महिन्यांच्या आत त्याच्या दुरुस्तीची योजना सादर करावी लागणार आहे. या घरांचे नुतनीकरण झाल्यावर त्यांच्या किमतीत प्रचंड वाढ होत अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याची अपेक्षा महापौरांना आहे.