धारगळ येथील घटना, कुडाळ येथील दोघे गंभीर जखमी

प्रतिनिधी /पेडणे
राष्ट्रीय महामार्गावर ओशालबाग धारगळ येथे सोमवारी पहाटे 5 वा. च्या दरम्यान फ्ढाŸर्च्युनर कारची रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून ओरोस कुडाळ येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हिमांशू, विक्रम अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
फ्ढाŸर्च्युनर कार क्रमांक एमएच-07-क्ममयू 9005 ही कळंगूट-बागाहून ओरोस कुडाळकडे जात होती. कारमध्ये पाचजण होते. कार ओशालबाग धारगळ येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक जीए-03öटी-7284 ला पाठीमागून धडकली. कारमध्ये हिमांशू, रौनक देसाई, सागर, विक्रम आणि तन्मय खानोलकर हे पाचजण होते. पाचपैकी तिघेजण सुखरूप आहेत. दोघे गाडीमध्ये अडकून पडल्याने ते जखमी झाले. अपघाताची माहिती पेडणे अग्निशामक दलाला मिळतातच दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
दोघेजण कारमध्ये अडकले
अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रथम चालकाच्या पाठीमागील सीटमध्ये अडकलेल्या विक्रमला बाहेर काढून जिल्हा इस्पितळात पाठविले. चालक हिमांशू हा सीट व स्टेअरिंगमध्ये अडकला होता. दलाच्या जवानांनी स्टेअरिंग व सीटचा भाग यंत्रणेच्या सहाय्याने कापून बाजूला केला व हिमांशूला बाहेर काढून जखमी अवस्थेत त्याला म्हापसा येथे जिल्हा इस्पितळात दाखल केले.
अग्निशामक दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रदीप असोलकर, चालक प्रमोद गवंडी, जवान अमोल परब, अमित सावळ, संदेश पेडणेकर, विकास चौहान, राजेश परब, यशवंत नाईक यांनी जखमींना बाहेर काढण्यात यश मिळवले. पेडणे पोलिसांना आपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले व अपघाताचा पंचनामा केला.