1983 पासून पडले होते रिकामी
जगात लोक राहत नसलेले शहर कुठेच नसेल. परंतु एक शहर पूर्णपणे निर्जन ठरले होते. या शहरात कुणीच राहत नव्हता, या शहरात भुताटकी असल्याचे म्हणत येथे कुणीच रहायला तयार होत नवहते. परंतु आता हे शहर एका कंपनीने खरेदी केले आहे. यामुळे 1986 पासून रिकामी पडलेल्या या शहरातील हालचाली आता वाढणार आहेत. येथे आता काहीतरी अनोखे काम होणार आहे.
हे शहर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात असून याचे नाव ईगल माउंटेन आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या जोशुआ ट्री नॅशनल पार्कच्या सीमेला लागून आहे. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनुसार हे शहर इकोलॉजी माउंटेन होल्डिंग्स नावाच्या कंपनीने खरेदी केली आहे. हे शहर 186 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले असून येथे अनोखे काम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कंपनी इकोलॉजी ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसशी निगडित असून ती रेड बिग रिग्ससाठी ओळखली जाते. हे शहर कधीकाळी अन्य अमेरिकन शहरांप्रमाणेच घरांनी, व्यवसायांनी अन् शाळांनी गजबजलेले होते, परंतु 1970 च्या दशकात कॅसर स्टीलमधील कर्मचाऱ्यांच्या कपातीसोबत याचे पतन सुरू झाले होते. येथून पलायन करत लोकांनी अन्यत्र स्थलांतर केले होते.
त्या काळात काही लोकांचे अनुकरण करत अन्य लोकांनीही असेच पाऊल उचलले आणि यामुळे या शहरात लोकच शिल्लक राहिले नाहीत. अखेरीस हे शहर पूर्णपणे बंद करण्यात आले. ईगल माउंटेनसोबत याच्या शेजारील शहरांमध्येही लोकसंख्येत घट होत राहिली. या शहरात कुणीच शिल्लक न राहिल्याने याला ‘घोस्ट टाउन’ घोषित करण्यात आले. यानंतर या शहराबद्दल अनेक कहाण्या पसरल्या होत्या. सध्या एका कंपनीने हे शहर खरेदी केले आहे. येथे आता ट्रक स्टॉप, गॅस स्टेशन, आणि हॉटेल विकसित करण्याची योजना असल्याचे समजते.