वारणानगर / प्रतिनिधी
सातवे ता.पन्हाळा येथील सातवे शिंदेवाडी रोड लगत शिशुविहार विद्यामंदिरा समोर असलेल्या गणेश मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून त्यातील रोकड लंपास केली. महादेव मंदिरा पाठोपाठ सप्ताहातील दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उड़ाली आहे.
बुधवार दि.८ रोजी सकाळी सात च्या सुमारास मंदिराचा पुजारी संभाजी बेटकर देवाची पूजा करण्यास गेला असता दानपेटी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांने मंदिराच्या विश्वतांना, अध्यक्ष,उपाध्यक्ष यांना बोलावून झालेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला . गेल्या आठ दिवसांपासून सलग ही दुसरी घटना घडल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
गणेश मंदीरातील दानपेटी अंगारकी संकष्टी ते अंगारकी संकष्टी एवढ्या कालावधी निश्चित करून विश्वस्त दान पेटी फोडून त्पांत जमा झालेल्या रक्कमेची मोजदाद करायचे यामध्ये सुमारे सोळा ते २० हजार रक्कम भाविक भक्ताकडून जमा होत होती यावेळी देखील येणाऱ्या अंगारकी संकष्टीला दानपेटी फोडायची होती तत्पूर्वीच चोरट्यानी या पेटीवर आपला हात साफ केला. सातवेत घटनास्थळावरून याबाबत माहिती उपलब्द झाली आहे कोडोली पोलिसानी महादेव मंदिरातील चोरीबाबत अद्याप काही ठोस तपास नसल्याने गणेश मंदिराच्या विश्वस्तानी याबाबत पोलीसात तक्रार दिली नसल्याचे समजते.