वृत्तसंस्था/ इस्ट लंडन
यजमान दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मुसळधार पावसामुळे वाया गेला. गुरुवारी येथे हा सामना आयोजित केला होता पण खेळ सुरू होण्यापूर्वीच पावसाचा अडथळा सुरू झाला आणि सातत्याने सरी कोसळल्याने पंचांनी हा सामना रद्द झाल्याची घोषणा केली.
या सामन्यासाठी पावसाळी वातावरणामुळे नाणेफेकही करण्यात आली नाही. पंचांनी दोन तासांच्या अंतरानंतर खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी केली आणि त्यांनी हा सामना होऊ शकणार नाही असे सांगितले. आता या मालिकेतील दुसरा सामना ईस्ट लंडनमधील बफेलो पार्क मैदानावर शनिवारी खेळवला जाणार असून येत्या मंगळवारी मालिकेतील शेवटचा सामना पोश्चेस्ट्रुम येथे होणार आहे.