महागाव गणात अप्पी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह , महागाव, हरळी खुर्द, हसुखाडी या गावात सत्तांतर
महागाव/ प्रकाश चौगुले
महागाव पंचायत समिती गणातील महागाव, हरळी खु.,वैरागवाडी,हासुरवाडी,हासुरसासगिरी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका मोठे इर्षेने पार पडल्या. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षासह, स्थानिक गट सक्रिय झालेले दिसून आले. त्यातच थेट जनतेतून सरपंच निवडीमुळे निवडणुकीत आणखी चुरस वाढली होती. ग्रामपंचायतींच्या निकालाने आप्पी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींच्या या निकालाने त्यांना बळ दिले आहे.
महागाव, हरळी व हसुरवाडी या गावात सत्तांतर झाले. वैरागवाडी व हसुरसासगिरी सदस्य बिनविरोध तर सरपंच पदासाठी निवडणूक होती. त्यामुळे पंचायत समिती महागाव गणाची ‘ सेमी फायनल ‘ या पाच गावात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून झाली आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेले व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले या पंचायत समिती गणांतील महागाव हे मोठ्या मतदार संख्येचे गाव आहे. येथील सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने पाटील, पताडे गटासह तिसऱ्या आघाडीत लढत झाली. यामध्ये अप्पी पाटील गटाच्या श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनलने १० वर्षानंतर सरपंच पदासह दहा सदस्य निवडून आले. तर प्रकाश पताडे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत महागाव ग्रामविकास आघाडी यांना पाच सदस्य निवडून आणता आले. या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा फायदा अप्पी पाटील गटाला झाल्याचे दिसून आला. अप्पी पाटील गटाकडून प्रशांत शिंदे यांची सरपंचपदी तर सदस्यपदी संदिप कोकितकर, ह्रदयनाथ सोमशेट्टी, विकास इंगवले, सुरज आसवले,परशुराम हुले, गौराबाई निकम, वैशाली पाटील, समिना बागवान,अनिता रेडेकर, हसीना सोलापुरे तर प्रकाश पताडे गटातील विलास रेडेकर,अख्तर बागवान, सरिता कोले,अन्नपूर्णा सोमशेट्टी,कमल पताडे हे सदस्य निवडून आले.
हरळी खुर्दचे सरपंच पद अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या ठिकाणी ही सैनिक संघटना, जनता दल, अप्पी पाटील गट व राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली. सोसायटीची सत्ता आजी- माजी सैनिक संघटनेने ताब्यात घेतली होती. आणि आता सत्ताधाऱ्यांना धक्का देत सैनिक संघटनेने ग्रामपंचायती मध्येही परिवर्तन घडवून आणत सरपंच पदासह सहा जागा निवडून आणल्या. हरळी खुर्द सरपंच पदी साधना आयवाळे तर सदस्यपदी चंद्रकांत राजे, श्रीदेवी कानडे, प्रदीप आयवाळे, वर्षा गुरव,भारती पाटील, शशिकांत चौगुले तर विरोधी गटाकडून संजय नाईक,अनिता साळवी, सुषमा कुंभार यांची सदस्यपदी यांचु निवड झाली.
हसुरवाडी ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच चौरंगी लढत झाली होती. या लढतीत ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर करत आप्पी पाटील पुरस्कृत श्री. रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार पॅनलने सरपंच पदासह पाच जागा जिंकून अणल्या. तर भाजप व राष्ट्रवादीला एका- एका जागेवर समाधान मानावे लागले. यामध्ये अप्पी पाटील गटाच्या कोमल भोसमोडे यांची सरपंचपदी तर सदस्यपदी जयदीप सरनोबत,सुनिता वाघराळकर, शुभांगी पाटील, अमित कांबळे, जयश्री कल्लोळी तर राष्ट्रवादीचे रामा चव्हाण व भाजपच्या रेखाताई गिरी यांची नियुक्ती झाली.
वैरागवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत पी.के. पाटील आणि त्यांच्या सहकार्यानी गावामध्ये गेल्या अनेक वर्षात केलेल्या विकास कामे, गावाला मिळवून दिलेल्या वेगवेगळ्या पुरस्कारामुळे व गावातील सर्वांना एकत्र करत सदस्यांची बिनविरोध निवड केली. मात्र सरपंच पदासाठी दुरंगी लढत झाली. या निवडणुकीत सरपंच पदी पी.के.पाटील तर सदस्य पदी सुनिल पाटील, मीरा पाटील, सुनिता पांडुरंग पाटील,उत्तम पाटील, सुनिता गणपती पाटील, मारुती गोते, स्नेहा बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.
हसुरसासगिरी ग्रामपंचायतसाठी शेवटपर्यंत बिनविरोध साठी प्रयत्न झाले. स्थानिक नेत्यांना सदस्यांची नियुक्ती बिनविरोध करता आली. मात्र सरपंच पदासाठी दुरंगी लढत झाली यामध्ये श्री महालक्ष्मी ग्रामविकास आघाडीचे प्रदीप कडुकर सरपंच पदासाठी तर सदस्यपदी रेखा कोंडुसकर, आनंद निंबाळकर,अनिता कदम, संगीता कोरे, प्रकाश कोरे, भैरवनाथ मिसाळ, गायत्री नाईक यांची बिनविरोध निवड झाली.
महागाव पंचायत समितीच्या जागा सर्वसाधारण स्त्री साठी राखीव आहे. मागील दहा वर्षांपासून या गणावर अप्पी पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे. यावर्षी महागाव पंचायत समिती साठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने या गावाच्या निवडणुकीवर अनेक नेते लक्ष ठेवून हेते. पुढील काही दिवसात प़चायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोण बाजी मारणार हे येत्या काळात करणार आहे.
महागाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या काळात ४० वर्षात झालेली विकास कामे आणि गेल्या दहा वर्षात झालेली विकास कामे यांची तुलना करत आमच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. तसेच येत्या पाच वर्षात महागाव विकासाच्या बाबतीत राज्यातील एक रोड मॉडेल असेल. या दृष्टीने विकास कमी करणार आहोत.तसेच भडगाव जिल्हा परिषद मतदार संघातील मोठ्या मतदारसंघाच्या भडगाव, महागाव, हसुरवाडी या ग्रामपंचायतीवर आमच्या गटाची सत्ता आल्याने भविष्यात भडगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती आमच्या गटाकडे राहील. या पद्धतीने आगामी निवडणूक लढणार आहोत.
अप्पी पाटील – माजी व्हा.चेअरमन :कोल्हापूर जिल्हा बँक