स्टायरिया / वृत्तसंस्था
ऑस्ट्रियन उद्योगपती आणि ‘रेड बुल’ एनर्जी ड्रिंकचे मालक डायट्रिच मॅटेस्किट्झ यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. डायट्रिच यांनी वयाच्या 78 व्या वषी अखेरचा श्वास घेतला. ऑस्ट्रियन उद्योगपती डायट्रिच मॅटेस्किट्झ यांनी 1984 मध्ये एनर्जी ड्रिंक कंपनी ‘रेड बुल’ची स्थापना केली होती. ऑस्ट्रियन-थाई ग्रुप रेड बुलचा चेहरा म्हणून मॅटेस्किट्झ प्रसिद्ध होते. मॅटेस्किट्झ यांनी जगभरातील 172 देशांमध्ये त्यांच्या रेड बुलचा व्यवसाय पसरवला. त्यांच्याकडे ‘रेड बुल’ची 49 टक्के शेअर्स मालकी होती. मॅटेस्किट्झ यांनी रेड बुल एनर्जी ड्रिंकला जगभरात लोकप्रिय करण्यासोबतच इतर क्षेत्रातही नावलौकिक मिळवला. फॉर्म्युला वन रेसिंग टीम ब्रँडच्या शेअर्समध्येही त्यांचा मोठा वाटा होता. तसेच मीडिया, रिअल इस्टेट आणि गॅस्ट्रोनॉमी आदी उद्योगांमध्येही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.