सुदैवाने मोठी दुर्घटना टळली : दक्षिण कोरियातील घटनेनंतर संबंधित अटकेत
वृत्तसंस्था सेऊल
दक्षिण कोरियातील एशियाना एअरलाईन्सच्या फ्लाईटमधील एका प्रवाशाने शुक्रवारी दरवाजा उघडला. विमान उतरायला फक्त 2 मिनिटे उरलेली असताना एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला. ही घटना घडत असताना विमान 700 फूट उंचीवर होते. तसेच विमानात 6 क्रू मेंबर्स आणि 194 प्रवासी होते. यादरम्यान 12 प्रवासी जखमी झाले असून कोणतीही मोठी दुर्घटना न घडल्याने विमान कंपनीने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एअरबस ए-321-200 चे ओझेड-8124 फ्लाइटने जेजू बेटावरून डेगू शहरासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9:15 वाजता उ•ाण केले. तासाभरानंतर प्रवाशाने दरवाजा उघडला. यानंतर प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. उतरल्यानंतर त्यांना ऊग्णालयात नेण्यात आले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर विमानात स्फोट होणार की काय अशी भीती प्रवाशांमध्ये निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही समजून येण्याच्या आतच दरवाजाजवळ बसलेले प्रवासी बेशुद्ध पडू लागले. याप्रसंगी विमानात असलेली लहान मुले रडू लागली, तसेच काही जण भीतीने थरथरत होते, असेही सांगण्यात आले.