शिंदे सरकारला 164 आमदारांचा पाठिंबा ः विरोधकांची आठ मते घटली ः
प्रतिनिधी/ मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप व त्यांचे समर्थक आमदार तसेच अन्य छोटे राजकीय पक्ष अन् अपक्ष आमदार यांच्या पाठिंब्याने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमताचा आकडा पार करत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. शिवसेना-भाजपने स्थापन केलेल्या शिंदे सरकारला 164 आमदारांनी पाठिंबा दिला. परंतु दुसरीकडे विरोधकांच्या मतात घट झाल्याने त्यांना शंभरचा पल्लाही गाठता आला नाही. महाविकास आघाडाला 99 मते मिळाली असून शिंदे सरकारची पुढची वाटचाल सुकर झाली आहे.
सपा, एमआयएम तटस्थ
मतदानावेळी समाजवादी पक्षाचे अबू आझमी, रईस शेख आणि एमआयएमचे आमदार फारूख अन्वर शाह हे तटस्थ राहिले. सुनील प्रभू यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचा, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी भाजप आणि शिंदे गटाला मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला होता. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी मंत्रिमंडळाच्या बहुमताचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भरतशेठ गोगावले यांनी अनुमोदन दिले. महाविकास आघाडीकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी मतदान घेण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी हा प्रस्ताव मतदानासाठी टाकला.
महाविकास आघाडीची 8 मते घटली
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 107 मते मिळाली होती. परंतु बहुमत चाचणीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे बहुमताच्या चाचणीच्या वेळी महाविकास आघाडीची 8 मते घटली. सकाळी 11 वाजता विश्वासदर्शक प्रस्ताव मांडल्यानंतर मतमोजणीस सुरुवात झाली व सभागफहाचे दरवाजे बंद करण्यात आले. मात्र तोपर्यंत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप सभागफहात दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे ते मतदानास मुकले. तसेच, प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर, जीशांत सिद्दीकी, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू अवले, मोहन हंबरडे, शिरीष चौधरीदेखील सभागफहात नव्हते. काँग्रेसचे इतके आमदार गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. तथापि चर्चा वाढल्यानंतर मात्र अशोक चव्हाण यांनी आपण महाविकास आघाडी सोबत असल्याचे स्पष्टीकरण दिले.
शिवसेनेला धक्क्यामागून धक्के
विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू आणि गटनेते म्हणून अजय चौधरी यांची निवड रद्द करत शिवसेनेला धक्का दिला. तर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटामध्ये दाखल होत शिवसेनेला दुसरा धक्का दिला. रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना बांगर यांनी मतदान केले. मात्र विश्वासदर्शक ठरावावेळी ते शिंदे गटासोबत बसमधून ते विधानभवनात दाखल झाले. बांगर यांच्यामुळे शिंदे गटाकडील शिवसेना आमदारांची संख्या 40 वर गेली आहे. शिवसेनेकडे आता केवळ 15 आमदार उरले आहेत.
‘भारतमाता की जय’च्या घोषणा
भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार यांनी बहुमताचा आकडा पार केल्यावर विजयी गटाच्या आमदारांनी सभागहात ’भारतमाता की जय, वंदे मातरम आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो’, ‘जय श्रीराम‘ अशा जोरजोरात घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.
इंधनावरील व्हॅट कमी करणार विश्वास संपादनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
शेतकरी सुखी तर जग सुखी, या न्यायाने शेतकऱयांना आवश्यक सुविधा देत, त्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. बळीराजाला सन्मानाची वागणूक देण्यात येईल. तसेच इंधनावरील व्हॅट कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न राहिले. हे सरकार कोणत्याही सूडबुद्धीने काम करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बोलताना त्यांनी त्यांनी अनेकांना चिमटे काढले. तर कधी भावूक झाले, कधी सात्विक संतापही व्यक्त केला. ते म्हणाले, हे सत्तांतर काही एकदोन दिवसांत झालेले नाही. आम्ही गद्दारी नाही, उठाव केला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराने आम्ही पुढे जाणार आहोत. आम्ही आजही आणि भविष्यातही शिवसैनिकच राहू. आम्ही जे केले त्यामागे हिंदुत्वाचा विचार आहे. हिंदुत्व हाच आमचा अजेंडा असल्याचा पुनरुच्चार केला.
त्यांना व्यथा ऐकायला वेळ नव्हता
महाविकास आघाडीमध्ये ज्यापद्धतीने चालू होते, त्यामुळे भविष्यात शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून येतील की नाही, असा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसैनिक माझ्याकडून येऊन त्यांच्या व्यथा सांगत होते. या व्यथा आम्ही आमच्या नेतफत्वाला सांगत होतो, पण त्यांना ऐकायला वेळ नव्हता, अशी खंत शिंदेंनी व्यक्त केली.
बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत
जळगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी ’काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राची वाट लावल्याची टीका केली होती. त्या आघाडीतून बाहेर पडून आम्ही या आदेशाचे पालन केले आहे. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. ज्यावेळी असे होत आहे, असे वाटेल तेव्हा मी माझे दुकान बंद करीन, असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेबांचे हेच विचार आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला लाभ होऊ शकला नाही. शिवसेनेकडे सत्ता असूनही त्याचा लाभ शिवसेनेला होणार नसेल, तर कधी होणार, हे ताडून आम्ही उठाव केला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आमच्या लोकांना चिन्ह काय मिळणार आदी चिंता सतावत होती. पण आम्ही शिवसैनिक आहोत. जिथे लाथ मारु तिथून पाणी काढू. माझ्यासोबत आलेल्या 50 आमदारांपैकी एकही आमदार पडू देणार नाही,
हे मोठय़ा विश्वासाने सांगत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. इतकेच नव्हे तर भाजपचे 115 मिळून आम्ही 200 करणार. असे केले नाही तर ‘गावाला शेती करायला जाईन’. विरोधी पक्षाकडून सत्तेकडे वाटचाल होते. पण इथल्या घटनेचा 33 देशांनी नोंद घेतली आहे. कारण हे 50 लोक मंत्री पद डावावर लावून माझ्याबरोबर आले आहेत. अन्यायाविरुद्ध उठाव करा, ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्याप्रमाणे आम्ही उठाव केला. हे बंड नव्हते.लढून शाहिद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही, हे मनाशी पक्के केले. सोबतच्या आमदारांना तशी खात्री दिली.
इतर धर्मियांचाही सन्मान राखू
हे सरकार हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणार आहे. मात्र इतर धर्मियाचा सन्मान करणार आहे. त्यामुळे त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. आता कागद खेळवणे, चिठ्ठीचे धोरण राहणार नाही. जिल्हाधिकाऱयांना फोन करून डायरेक्ट कार्यवाही असेल. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद आहे. पेंद्रीय गफहमंत्री अमित शहा यांचा पाठिंबा आहे. आता पेंद्र आणि राज्य यांच्या चांगल्या संबंधातून सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुलांच्या आठवणीने झाले भावुक
माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा वाईट प्रसंग आला, माझी दोन्ही मुलं माझ्या डोळय़ासमोर गेली. त्यावेळेस मला आनंद दिघे यांनी आधार दिला. माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. मी म्हटले की, आता कशासाठी आणि कोणासाठी जगायचे. मी ठरवले की, आता फक्त माझी पत्नी, आई -वडील आणि मुलगा श्रीकांत यांच्यासाठीच जगायचं, माझे आता काहीही राहिलेले नाही. कारण माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळ सभागफहात भावूक झाले.
एकनाथ शिंदेंना घेऊन आलो! ः देवेंद्र फडणवीस

‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’ या माझ्या विधानाची खिल्ली उडवली गेली. पण मी आलो आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन आलो, असे देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासदर्शक ठरावाची लढाई जिंकल्यावर सांगितले. आता शिवसेना आणि भाजप युतीने सरकार बनले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून यशस्वीरीत्या काम करतील. कारण ते संवेदनशील आहेत. त्यामुळे सरकारही संवेदनशील राहील. उचलू आणि जेलमध्ये टाकू हे बरोबर नाही. लोकशाहीत दुसरा आवाज ऐकला पाहिजे, असे म्हणत त्यांनी नारायण राणे, नवनीत कौर राणा, रवी राणा, केतकी चितळे यांची ओघवती उदाहरणे दिली. खिल्ली उडवणाऱयांचा बदला घेणार असल्याचे सांगत काही क्षण पॉझ घेतला आणि त्यांना माफ केल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमच्याकडे संख्याबळ असतानाही आम्ही विरोधात बसलो. पण विचलित नाही झालो. सातत्याने संघर्ष करत राहिलो. हे सरकार जाईल तेव्हा आम्ही
पर्यायी सरकार देऊ असे म्हणालो होतो.
त्याप्रमाणे अनैसर्गिक पद्धतीने बनलेले सरकार गेले आहे आणि आम्ही पर्यायी सरकार दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनविले आहे. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभे आहोत. पॉवर स्ट्रगल राहणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
चांगले निर्णय रद्द करणार नाही
मागच्या सरकारने शेवटच्या पॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय रद्द न करता ते पुन्हा पॅबिनेटमध्ये घेऊ. त्यातले चांगले निर्णय लागू करू आणि बाधक रद्दबातल करू. कारण राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर मंत्रीमंडळाची बैठक घेतली जात नाही, हे संकेत आहेत. परंतु राज्यपाल्याच्या निर्णयानंतरही महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही निर्णय घेतले. हे निर्णय लागू करण्यासाठी आम्ही पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागफहात नमूद केले.