वृत्तसंस्था/ बार्सिलोना
ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील सोमवारी येथे झालेल्या सामन्यात कॅडिझ क्लबने बलाढय़ बार्सिलोना क्लबचा 1-0 असा पराभव केला. या पराभवामुळे या स्पर्धेत आघाडी घेत जेतेपदासमीप असलेल्या रियल माद्रीद संघाच्या समीप जाण्याची बार्सिलोनाची आशा संपुष्टात आली आहे.
या स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात रियल माद्रीद संघाने सेव्हीलाचा पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांनी बार्सिलोनापेक्षा 15 गुण अधिक नोंदविले आहेत. बार्सिलोना संघ दुसऱया स्थानावर आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात कॅडिझतर्फे एकमेव निर्णायक गोल 48 व्या मिनिटाला पेरेझने नोंदविला. या स्पर्धेत बार्सिलोना संघाला गेल्या 16 सामन्यांत प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे. ला लीगा स्पर्धेत बार्सिलोना संघ 31 सामन्यांतून 60 गुणांसह दुसऱया स्थानावर असून रियल माद्रीद 75 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. कॅडिझने 32 सामन्यांतून 31 गुण नोंदविले आहेत.