हाताच्या तळव्यांवर मावेल इतकाच आकार

निसर्गाने प्रत्येक जीवाला खास ओळख दिली आहे. एखाद्या प्राण्यात उडण्याची क्षमता असते, तर काही जणांमध्ये रंग बदलण्याची क्षमता आणि काही प्राणी वेगाने धावण्याची शक्ती बाळगून असतात. अशाचप्रकारे काही प्राणी आकाराने लहान असले तरीही त्यांना पकडणे अत्यंत अवघड असते. ससा अशाच प्राण्यांपैकी एक आहे. जगात सशाच्या एका प्रजातीचा आकार अत्यंत छोटा असून तो मानवी हातांच्या तळव्यांवर मावू शकेल इतपत आकाराचा असतो.
या प्रजातीच्या सशाला जगातील सर्वात छोटा ससा मानले जाते. कोलंबिया बेसिन पिगमी रॅबिटला जगातील सर्वात छोटा ससा असण्याचा दर्जा प्राप्त आहे. याचमुळे ही प्रजाती अत्यंत दुर्लभ मानली जाते. जगात केवळ एका विशेष ठिकाणीच या प्रजातीच्या सशांचे वास्तव्य आहे.
अत्यंत छोटा आकार
वॉशिंग्टन स्टेट एरियाच्या एका हिस्स्यात याप्रकारचे ससे आढळून येतात. यांचे वजन केवळ 500 ग्रॅमपर्यंत असते. तर यांचा आकार 23.5 सेंटीमीटरपासून 29.5 सेंटीमीटरपर्यंत असतो. परंतु सशांची ही प्रजाती रानटी असल्याने त्यांना घरात पाळले जात नाही. ही प्रजाती अत्यंत दुर्लभ आणि विलुप्त होण्याच्या वाटेवर असल्याने त्यांना पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवले जात नाही.
2001 मध्ये विलुप्त घोषित
या प्रजातीला 2001 मध्ये जंगलांमधून विलुप्त घोषित करण्यात आले होते, परंतु त्यापूर्वी सुमारे 14 सशांना विशेष ठिकाणी ब्रीडिंगसाठी ठेवण्यात आले होते. या प्रजातीचे ससे छोटय़ा संख्येत इनब्रीडिंग करत नसल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले. या सशांच्या इनब्रीडिंगसाठी मोठय़ा संख्येची गरज असते. वैज्ञानिक क्रॉस ब्रीडिंग करून त्यांना सुरक्षित ठेवू पाहत आहेत. हे ससे सेजब्रश नावाच्या रोपांना खात असतात ही रोपे उत्तर अमेरिकेत आढळून येतात. परंतु जंगलतोड आणि वणव्यांमुळे त्यांचे प्रमाण कमी झाल्याने सशांच्या प्रजातीचे प्रमाणही घटू लागले.