Sharad Pawar : कट्टर शिवसैनिक अजूनही शिवसेना (ठाकरे गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे आणि ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. ते आज कोल्हापूरात बोलत होते.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराजाच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापुर दौऱ्यवर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष षरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “शिवसेनेतून एक दुफळी होउन एक गट बाहेर पडला ही वस्तुस्थिती आहे. काही आमदार आणि खासदार आपली निष्ठा बदलून ठाकरेंपासून दूर गेले आहेत. पण जेव्हा मी राज्यभर फिरतो तेव्हा असे लक्षात येते की तळागाळातील कटिबद्ध सैनिक दूर गेलेला नाही. ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत.”
सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या मंत्री आणि सदस्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पवार म्हणाले, “सत्तेत असताना पाय जमिनीवर ठेऊन काम करावे” पण सत्ताधारी सरकारकडून हा नियम पायदळी तुडवल्याचे दिसत आहे. हे खुपच चिंताजनक आहे.” असे ते म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचेही (Bharat Jodo Yatra) पवारांनी कौतुक केले. ते म्हणाले “जेव्हा राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा भाजप नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवली. ही केवळ काँग्रेस पक्षासाठी काढलेली यात्रा नाही. या यात्रेत विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे लोक सहभागी झाले आहेत.” असेही ते म्हणाले.
Previous ArticleRatnagiri : व्यवस्थापकाने लावला हॉटेल मालकाला ५ .८७ लाखाला चूना
Next Article पुण्याचा अभिजीत कटके ‘हिंदकेसरी’चा मानकरी
Related Posts
Add A Comment