
वार्ताहर /माशेल
गोवा मुक्तीपुर्व काळापासून आपल्या पुर्वजांनी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत घरातील एका पेटीला गणपतीचे चित्र चिकटवून तर कधी एकवीस तऱहेची पत्री एकत्रित करून त्यावर गणपतीचा फोटो लावून पेटीत गणपती पूजन करून श्रीगणेशाला वाहिलेली भक्ती परंपरा आजही माशेल येथील सुखठणकर कुटूंबियांनी जपलेली आहे. आनंद सुखठणकर यांच्या घराण्यात चतुर्थीला दोन गणपतीची पूजा केली जाते. एक पगडीचा गणपती जो मखरात बसविण्यात येतो तर दुसरा पत्रीचा गणपती घरच्या देवाऱयात ठेऊन पुजाअर्चा केली जाते.
अजय सुखठणकर यानी दिलेल्या माहितीनुसार या गणपतीला तीनशे वर्षाची परंपरा आहे. पोतुर्गीज काळात गणपती पूजनास परवानगी नव्हती, मुक्तीपुर्व काळात पोतुगीज गोमंतकीयांना देवपूजा करू देत नसे. गणपती पूजनासाठी मुर्ती पूजेला लावणे हे जोखीमीचे काम होते. घरातील एका पेटीला गणपतीचे चित्र चिकटवून किंवा एकवीस तऱहेची पत्री (पाने) एकत्रित करून त्यावर गणपतीचा फोटो लावून हा गणपती पेटीत पुजण्यामागचे कारण म्हणजे एखाद्यावेळी पोर्तुगीजापैकी कोणी घरात आला तर ती पेटी लगेच बंद करता येते म्हणून गणपती पेटीत पुजायचे सोयीस्कर मार्ग सुखठणक कुटूंबियांचा होता.
सुखठणकर यांनी दोन गणपती पुजण्याची परंपरा बरीच जुनी आहे. सुखठणकर हे शास्त्री घरणे असल्यामुळे पगडीचा गणपती पुजण्याची प्रथा होती. पगडीचा गणपती मखरात बसविण्यात आलेल्या एका घुमटी विराजमान करण्यात येतो. मखर रंगविण्याचे मान परब कुटूंबियाचा आजही पाळला जातो. दुसरा पगडीचा गणपती घरच्या देवघरात पुजला जात असून त्याची आरास दीड दिवसाची असते. त्याचे दीड दिवसात विसर्जन केले जाते. मखरात बसविलेला गाणपती सात दिवसाचा असतो. नित्य पूजा, शेवटच्या दिवशी महाप्रसाद त्यानंर उत्तरपूजा करून घुमटीत बसून गणपती तारीवाडा येथे सांगडासाठी नेला जातो. सांगोड सावंत कुटूंबियाकडून तयार केला जातो. शांतादुर्गा पुंभारजुवेकरीण देवस्थानातील गणपती पालखीने सांगड उत्सवाला नेतात. कुंभारजुवेकरीणीचा एक सांगोड उत्सवानिमित्त कुंभारजुवेतील युवक अनेक प्रकारचे पौराणिक चित्ररथ सांगोडात तयार करतात. सात फेरे घेऊन गणपतीचे विसर्जन केले जाते. सुखठणकर कुटूंबिय शास्त्री तसेच आयुर्वेदीक औषधांसाठी प्रसिद्ध होते. गोव्यातील पहिली पदवीप्राप्त मिळवलेले वैद्य प्राणाचार्य विठ्ठल सुखठणकर होत. त्याना सर्वत्र मोठा मान होता. त्यावेळचे गव्हर्नरनरांनाही ते औषधोपचार करीत असे. त्यामुळे सांगडोत्सवा निमित्त सांगडाला ध्वज लावण्यात कोणी हरकत घेत नसे.
सुखठणकरर कुटूंबियाच्या अनेक पिढीने ही परंपरा पुढे नेली असून आजही दिलीप सुखठणकर, अजय सुखठणकर ही नवीन पिढी त्याच उत्सवाने वडीलोपार्जित ही परंपरा आहे ती राखून ठेवली आहे.