ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या श्रेयवादावरून शिंदे गटाचे समर्थक आपापसात भिडले. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत राडा घातला. उल्हासनगरजवळील एसएसटी कॉलेजसमोर हा राडा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील व्हीनस चौक ते श्रीराम चौक असा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या श्रेयावरून शिंदे गटातील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचा पती वसंत भोईर आणि युवसेना संपर्क प्रमुख विजय जोशी यांच्यात वाद होते. शिंदे समर्थकांमधील हे दोन्ही गट आज रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटाकडून लाठ्या-काठ्यांनी एकमेकांना मारहाण केली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत.
अधिक वाचा : नासाचं ‘मिशन मून’ पूर्ण; 26 दिवसांनी पृथ्वीवर परतलं ओरियन अंतराळयान
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे.