पणजी : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आगशी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात भादंसं 354(डी), 509 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयिताचे नाव विराज वसंत च्यारी(39, कोलवाळ बार्देश, गोवा) असे आहे. संशयित पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रस्त्याने चालत जाणाऱ्या विद्यार्थिनींची मदत घेत असे आणि त्या त्यांच्या जवळ आला की तो त्यांच्या समोर अश्लील चाळे करून दाखवत होता. गोवा विद्यापीठाजवळ यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या होत्या. मात्र विद्यार्थिनी तक्रार करण्यास पुढे येत नव्हत्या. शुक्रवारी पोलिसांनी महिलांसाठी महिला सुरक्षा याबाबत संवादात्मक सत्र आयोजित केले होते. त्याच कार्यक्रमातून प्रोत्साहित होऊन विद्यार्थिनी तक्रारी नोंदवण्यास पुढे येत आहेत, असेही पोलिसांनी सांगितले आहे. आगशी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Previous Article‘क्रिएटर्स कनेक्ट’द्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी
Next Article दहशतवादाच्या सर्वाधिक वेदना झेलणारे राहुल गांधी
Related Posts
Add A Comment