गणेश दूध संकलन केंद्राचे प्रो. उमेश देसाई यांचे प्रतिपादन
वार्ताहर /उचगाव
भेसळ, कमी फॅट व एसएनएफचे दूध शेतकऱ्यांसह संकलन करणाऱ्या संस्थांनाहीनन हानीकारक असते, असे दर्जाहीन दूध पिण्यासाठीही निकृष्ट असते. शेतीला जोडधंदा म्हणून जर दूध व्यवसायातून क्रांती करायची असेल तर दर्जेदार दूध उत्पादनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन गणेश दूध संकलन केंद्राचे प्रोप्रायटर उमेश उर्फ प्रवीण मोतीराम देसाई यांनी केले.
बेळगुंदी फाट्यावरील गणेश दूध संकलन केंद्रातर्फे आयोजित दूध उत्पादकांच्या बैठकीत ते बोलत होते. उमेश देसाई पुढे म्हणाले, सर्वोत्तम दुधासाठी म्हशीचे दूध 6 फॅट आणि गाईचे दूध 3.5 फॅटचे असणे आवश्यक असते. काही शेतकरी दूध वाढवण्यासाठी पाणी भेसळ करत असतील तर त्याचा फटका त्या शेतकऱ्यालाच बसतो. दूध कमी आणि ते चांगले फॅट व एसएनएफचे असेल तर त्याचा दर चांगला मिळतो, असे सांगितले.
केंद्राच्या संस्थंना व्यवस्थापन खर्च म्हणून प्रतिलिटर एक रुपये गणेश दूध केंद्रातर्फे दिले जातात. गणेश दूधतर्फे 6 फॅट म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 48 रुपये दिले जात असून शाखांना 49 रुपये दिले जातात.
गाईच्या 3.5 फॅट दुधाला प्रतिलिटर 35.50 रुपये शेतकऱ्यांना तर संसथांना 36.50 रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना जो दर देणे अपेक्षित आहे. तो विनाकपात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मॅनेजर सुधाकर करटे, संचालिका अरुंधती देसाई यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते.
गणेश दूधतर्फे बोनसमध्ये वाढ

गणेश दूधतर्फे शेतकऱ्यांना बोनस वाढवला असून म्हशीच्या दुधाला शेकडा पाच टक्के तर गाईच्या दुधाला शेकडा तीन टक्के बोनस दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे फॅट कमी लागत असेल, त्यांनी गणेश दूध केंद्राशी संपर्क साधावा.
-उमेश देसाई, प्रोप्रायटर गणेश दूध संकलन केंद्र.
अखेर गणेश दूधला थेट पुरवठा

दूध शाखेत योग्य दर मिळत नसल्याने अखेर गणेश दूधला थेट पुरवठा सुरू केला. यावेळी प्रतिलिटर 10 ते 12 रुपये अधिक दर मिळत असल्याने नफा वाढला आहे.
– सुभाष मेघोचे, तुरमुरी
उत्पादन वाढविण्यास प्रेरणा

लिटरमागे दहा ते बारा रुपये नुकसान होत होते. गावात प्रतिलिटर 50 रुपये मिळणारा दर गणेश दूध संकलन केंद्राकडे पुरवठा सुरू केल्यानंतर आता 60 ते 62 रुपये मिळत आहेत. यामुळे उत्पादन वाढविण्यास प्रेरणा मिळाली.
– प्रकाश मेघोचे, तुरमुरी.