Trendy jackets: प्रत्येकाच्या वॊर्डरॉब मध्ये किमान एखादं तरी जॅकेट असतेचं. कोणतही जॅकेटमुळे कलासी लुक मिळतो. शिवाय काही जॅकेट्स कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाहीत.तसेच जॅकेट घालून अनेक लुक क्रिएट करता येतात.आज आपण अशाच काही ट्रेंडी जॅकेट्स बद्दल जाणून घेणार आहोत जे जॅकेट्स तुमच्याजवळ असायलाच हवेत. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही आऊटफिट सोबत मॅच करू शकता.
डेनिम जॅकेट
कधीही आऊट ऑफ न होणारं जॅकेट म्हणजे डेनिम जॅकेट.वनपीस,ड्रेस ,स्कर्ट,जीन्स,शॉर्ट्स, कुर्ती अशा अनेक लुकवर सहज जाणारं हे जॅकेट आहे.पार्टी ,ट्रिप ,ऑफिस अशा अनेक ठिकाणी तुम्ही हे जॅकेट ट्राय करू शकता. त्यामुळे एकाच प्लेन कलरचं डेनिम जॅकेट तुमच्याजवळ असायला काही हरकत नाही.

लेदर जॅकेट
तुम्हाला जर स्पोर्टी लुक हवा असेल तर लेदर जॅकेट हा एक उत्तम पर्याय आहे.खास करून काळ्या रंगाचं लेदर जॅकेट खरेदी केलं जातं. नाईट लुक तसेच ट्रॅव्हलिंगसाठी हे जॅकेट वापरलं जातं.

किमोनो
किमोनो हा एक लांब आणि सिम्पल जॅकेट टाईप आहे.शिवाय हे जॅकेट वजनाने हलके असल्याने सहज कॅरी करता येते. तुम्हाला जर बीच वर स्विम सूट घालायचा असेल तर त्यावर किमोनो आणखीनच मॉडर्न लुक देऊन जातो.हे जॅकेट तुम्ही शॉर्ट्स स्कर्ट्स वर ट्राय करू शकता.

ब्लेझर
ब्लेझर हे नेहमीच ऑफिस लुकसाठी परफेक्ट आहे. पण आजकाल साडीवर देखील ब्लेझर घालण्याचा ट्रेंड सुरु आहे.त्यामुळे अशा प्रकारच्या ब्लेझरमध्ये इन्व्हेस्ट करण्यात काहीच हरकत नाही.
