कोल्हापूर : गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात, डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई.. डीजेच्या ठेक्यावर बेधुंद होत तरुणासह अबाल वृद्धांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 27 तास चालली कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर शैलेश बलकवडे यांच्या हस्ते शेवटच्या श्री भगतसिंग तरुण मंडळाच्या बाप्पाची आरती करून गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी पोलिसांनी देखील डीजेच्या तालावर ठेका धरला.
कोरोनाचा दोन वर्ष निर्बंधाचा काळ समाप्त झाल्यानंतर यंदा धुमधडाक्यात आणि तितक्याच उत्साहात गणेश उत्सव सोहळा पार पडला. कोल्हापुरातील मानाचा गणपती समजला जाणारा श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची आरती करून कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक पार पडली. तर सायंकाळी सहा नंतर डोळे दीपवणारी विद्युत रोषणाई, लेझर लाईट इफेक्ट्स आणि साऊंड सिस्टिमच्या तालावर मिरवणूक पार पडली. मात्र राज्य सरकारच्या नियमानुसार रात्री बारानंतर कोल्हापूर पोलिसांनी डीजे बंद केला. मात्र मंडळानी ज्या त्या ठिकाणीच साऊंड सिस्टिम लावून पोलिसांच्या या भूमिकेचा विरोध केला. अनेक तरुण मंडळांनी त्याच ठिकाणी रात्र घालवली. सकाळी पुन्हा या मिरवणुकीला सुरुवात झाली. कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच तब्बल 27 तास ही गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. पापाची तिकटी इथं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या उपस्थितीत श्री भगतसिंह तरुण मंडळ यांच्या बाप्पांची आरती करून विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी पोलिसांनी देखील मै हूॅं डॉन या गाण्यावर ठेका धरला.
ही मिरवणूक २७ तास पार पडली असून कोल्हापूर पोलिसांनी केलेले बंदोबस्त आणि नियोजन यामुळे मिरवणुकीला कोठेही गालबोट लागले नाही. तसेच कोणतीही घटना घडलेली नाही. यंदा सार्वजनिक तरुण मंडळाने प्रशासनाच्या नियमांचे पालन केले असून पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले.
Trending
- मंगाई देवीची यात्रा ११ जुलै रोजी
- सिद्धेश कानसे यांच्या निसर्गचित्राला प्रथम क्रमांकासह राष्ट्रीय कला पुरस्कार
- सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्य़ांवर कायदेशीर कारवाई; इंटरनेट काही काळासाठी बंद करणार; अफवांवर विश्वास ठेऊ नका
- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर
- Kolhapur Breaking : कोल्हापूरातील परिस्थिती नियंत्रणात; पोलिसांचा अश्रुधुराचा वापर
- कोल्हापुरात वातावरण तंग ; संजय राऊत, अतुल भातखळकर, राजेश क्षीरसागर, मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
- नियाजचे मालक नौशाद सौदागर यांचे निधन
- Sangli Breaking : इस्लामपुरात गुंडाचा गँगमध्ये सहभागी होत नसल्याने गेम