वार्ताहर/ मायणी
राजकारणापेक्षा समाजकारण करण्यात आजपर्यंतच्या राजकीय जीवनात मी प्राधान्य दिले. म्हणून मी राजकारण सोडणार नाही. मी माणसे ओळखण्यात चूक केली. ज्या पक्षाच्या वाढीसाठी मी प्रयत्न केले त्याच पक्षातील लोकांनी मला त्रास दिला. ज्यांनी त्रास दिला त्यांना सोडून व उर्वरित लोकांना बरोबर घेऊन आपण यापुढे भविष्यात खटाव तालुक्याच्या विकासाचा निर्धार करून राजकारण करू असे प्रतिपादन खटाव मान प्रो ऍग्रो लिमिटेड साखर कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांनी केले.
प्रभाकर घार्गे यांचा कारखाना कार्यस्थळावर वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते सत्कारास उत्तर देताना बोलत होते .सदर वेळी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे सदाशिव खाडे, डॉ. दिलीप येळगांवकर, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, मनोजदादा घोरपडे, विक्रम घोरपडे, संग्राम घोरपडे,डॉ. सुरेश जाधव, धैर्यशील कदम, डॉ. संदीप पोळ, सौ. इंदिरा घार्गे, कु. प्रिती व कु. प्रिया घार्गे, महेश घार्गे,मनिषा काळे, राहुल पाटील मामू वीरकर, संचालक , परिसरातील गावोगावचे सरपंच ,सोसायटीचे चेअरमन व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

प्रभाकर घार्गे पुढे म्हणाले ,यापुढे तालुक्याच्या विकासात योग्य भूमिका घ्यावी लागणार आहे .कारखान्याच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना दिली. मात्र त्याला राजकीय स्वरूप देऊन कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला ,कारण त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती. मात्र कारखान्यातील महत्त्वाच्या व्यक्ती नसताना देखील त्यांच्या गैरहजेरीत सर्व संचालकांनी व सर्व कर्मचायांनी मोठय़ा ताकतीने कारखाना चालवून उत्तम प्रकारचे साखरचे उत्पादन घेतले .सदर वेळी या परिसरातील शेतकयांनी देखील आम्ही नसताना कारखान्यावर विश्वास दाखवून पैसे बुडणार नाहीत हा विश्वास दाखवून आम्हास ऊस घेतला .सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशात प्रथम क्रमांकाची बँक आहे. ही बँक कोणा पक्षाची वा कोणाच्या मालकीची नाही तर ती शेतकयांच्या मालकीची आहे. हा तालुका गुलामगिरी पत्करणार नाही. विचाराची बांधिलकी जपणारा आहे .या तालुक्यात चुकीच्या पद्धतीने अन्याय केल्यास स्वाभिमानाने राहण्याचा आपण निर्णय घेतला आहे .सातत्याने खटाव तालुक्यावर अन्याय झाला आहे. तालुक्याला ना मंत्री पद ,ना खासदारकी ना संघटनेत मोठे पद .अशा प्रकारे सातत्याने अन्याय करण्यात आला. तालुक्याच्या विकासात राजकारणात मी कुठेही कमी पडणार नाही. तालुक्यात आज पर्यंत एमआयडीसी देखील मिळाली नाही .मात्र त्यासाठी आपण इथेनॉल प्रकल्पाच्या जागी एमआयडीसी सुरू करण्याचा आज शुभारंभ करत असून त्या निमित्ताने उद्योग क्षेत्रात बळकटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आ.शहाजी बापू पाटील म्हणाले, या कारखान्याचे काम सर्वच बाबतीत प्रथम क्रमांकाचे काम असून त्यामुळेच आज महाराष्ट्रातील प्रथितयश साखर कारखान्याच्या यादीत या कारखाण्याचा समावेश झाला आहे .या व्यासपीठावरील मान्यवरांच्या भाषणातून त्यांची तालुक्याबद्दल असलेली तळमळ दिसून आली असून त्यांचा निश्चितपणे जनतेचे प्रश्न सुटतील. ज्या राजकारणात प्रभाकर घार्गे नाहीत हे राजकारणच होऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी प्रभाकर घार्गे यांच्या पाठीशी उभे राहावे.
माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, आम्ही वेळ आल्यानंतर एकमेकांना मदत करताना मागेपुढे पाहणार नसून तालुक्याच्या हितासाठी तालुक्यातील सर्व जनता तुमच्या पाठीशी राहील.तालुक्यातील विकासाच्या संदर्भात जुन्या व नव्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून आपण प्रयत्न करू आणि प्रश्नाचे सोडवणूकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे .आज पर्यंत जे मंजूर नव्हते ते मंजूर करून घेतले. सोळशी धरणाचा प्रश्न मार्गी लार्कन आम्ही पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु.आम्ही खुर्चीसाठी भांडत नाही ज्याला कोणाला खुर्चीवर बसायचे त्यांनी आवर्जून खुर्चीवर बसावे . खटाव तालुक्याचे तीन तुकडे झाले. खटाव तालुक्यात दोन खासदार व तीन आमदार निवडून आणण्याची ताकद आहे. या ताकदीकडे दुर्लक्ष करून तालुक्यास कमी लेखू .नका प्रभाकर घार्गे यांना विरोधकांनी त्रास दिला असता तर ते एक वेळ चालले असते. मात्र ज्या पक्षाला प्रभाकर घार्गे यांनी ताकद दिली त्यांनीच त्रास दिला. त्यामुळे सर्वजण प्रभाकर घार्गे यांच्या पाठीशी राहून सर्व तालुका एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करू.
कारखान्याचे को चेअरमन मनोज घोरपडे म्हणाले ,कारखाना एका संकटातून बाहेर पडला असून आता सर्व स्थिर झाले आहे. घडलेल्या घटनेतून कारखान्यास दिशा मिळाली आहे .हा कारखाना उद्ध्वस्त करण्यासाठी खोटय़ा केसेस करण्यात आल्या. त्यासाठी मोठी राजकीय ताकद वापरली,पण ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच होती. मात्र या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक लोकांनी आपणास सहकार्य केले. कारखान्याच्या व्यवस्थापनामुळे हा कारखाना आमच्या गैरहजेरीत देखील चांगल्या पद्धतीने सुरू राहिला. आगामी वर्षात नऊ लक्ष मॅट्रिक टन उसाच्या गाळपाचे आपले उद्दिष्ट असून या कारखान्याच्या माध्यमातून या परिसरात आणखी आठ ते दहा उद्योग करून आपण ते सक्षमपणे चालू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हरणाई सूतगिरणीचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख म्हणाले,कारखान्यातील व्यवस्थापनातील बारा लोक नसताना देखील या कारखान्यातील सर्व कर्मचारी व संचालकाने कष्ट घेऊन हा कारखाना उत्पादनात प्रथम क्रमांकात ठेवला. घार्गे साहेब अटकेत असताना देखील सोसायटीतील मतदार साहेबांसोबत राहिले .यापुढील काळात तालुक्याचा अभिमान घाण पडेल असे कृत्य होणार नाही याची आपण काळजी घेऊ.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई ,संजीव साळुंखे, शिवाजी सर्वगोड ,मनीषा काळे, अशोक कुदळे आदी मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याच्या संचालिका कु. प्रीती घार्गे यांनी केले.