ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील तीन आमदार आणि भाजपातील काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादीत येण्याची त्यांची इच्छा आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.
दौंडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मिटकरी म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही. नाहीतर त्यांनी आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटातील तीन आमदार व भाजपचे काही आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत.
अधिक वाचा; Pune : अपहार प्रकरणी सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांवर गुन्हा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात हे आमदार आहेत. हे आमदार विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. भाजपचेही काही आमदार संपर्कात आहेत पण त्यांचा आकडा आता सांगणार नाही, असेही मिटकरी म्हणाले.