सीगन चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित सीगन चषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात टिळकवाडी क्लब संघाने डायमंड स्पोर्ट्स संघाचा 40 धावानी तर सीसीआय बी संघाने केएसजीईए संघाचा दोन गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. ओंकार चव्हाण व गौरव कांटे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात टिळकवाडी क्लबने 19.1 षटकात सर्व बाद 111 धावा केल्या. दीपक बेल्लदने 25, विनयने 17, स्वराजने 14 धावा केल्या. डायमंडतर्फे पुंडलिक व आनंद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना डायमंड स्पोर्ट्स संघाचा डाव 19.1 षटकात 71 धावात आटोपला. विनायकने 17 तर आनंदने 15 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे ओंकार चव्हाणने 5 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात केएसजीईए संघाने 12.3 षटकात सर्व बाद 97 धावा केल्या. रणबीरने 19 तर रवीने 18 धावा केल्या. सीसीआय बी संघातर्फे सुभाष पाटीलने 3 तर प्रथमेशने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीआय बी संघाने 18.2 षटकात 8 बाद 99 धावा करून सामना दोन गडय़ानी जिंकला. गौरव कांटेने 4 चौकारासह 34 तर दर्शनने 14 धावा केल्या. केएसजीईएतर्फे राघवेंद्रने 3 तर आर्यनने 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर ओंकार चव्हाण, इम्पॅक्ट खेळाडू दीपक तर दुसऱया सामन्यात सामनावीर गौरव कांटे व इम्पॅक्ट खेळाडू राघवेंद यांना चषक देवून गौरविण्यात आले.