डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार प्रदर्शित
डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मने स्वतःची नवी वेबसीरिज ‘दहन-राकन का रहस्य’चा ट्रेलर सादर केला आहे. ही एक हॉरर सीरिज असून यात टिस्का चोप्रा आणि सौरभ शुक्ला मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन विक्रांत पवार यांनी केले आहे. तर याची कथा निसर्ग मेहता, शिव वाजपेयी तसेच निखिल नायर यांनी लिहिली आहे.

दहनची कहाणी एका काल्पनिक गावावर असून याला मृतांची भूमी म्हणून दर्शविण्यात आले आहे. टिस्का चोप्रा आयएएस अधिकारी अवनी राऊत ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या सीरिजमध्ये राजेश तैलंग, मुकेश तिवारी, अंकुर नैयर, रोहन जोशी, लहर खान हे देखील कलाकार दिसून येणार आहेत. या सीरिजची निर्मिती दीपक धर आणि ऋषी नेगी यांनी केली आहे.
दहन या सीरिजमध्ये 9 एपिसोड्स असून ती 16 सप्टेंबरपासून स्ट्रीम होणार आहे. दहन-राकन का रहस्य या सीरिजद्वारे आम्ही पेक्षकांना पौराणिक आणि पारलौकिक पार्श्वभूमीवर दाखविणार आहोत असे पवार यांनी म्हटले आहे.