प्रतिनिधी /पणजी
कारापूर साखळी येथील श्री शांतादुर्गा देवीचा वार्षिक सप्ताह सोमवार ता. 22 ऑगस्ट रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनीशी साजरा होणार आहे. सकाळी श्री शांतादुर्गा देवीच्या मंदिरात पूजा अर्चा व धार्मिक विधी.
दुपारी 12 वाजता धार्मिक विधी, दुपारनंतर प्रत्येक वार्डनीहाय पार चे मंदिरात आगमन व अखंड भजन सप्ताहाला सुरुवात. रात्री 9 वा. श्री पांडुरंग राऊळ, गणेश पार्सेकर, प्रल्हाद गावस आदी गायक कलाकारांना पुष्पशिल मलिक (तबला) दत्तराज माळशी (हार्मोनियम) व विराज गावस (पखवाज) यांची साथसंगत मिळेल. तद्नंतर स्थानिक कलाकारांतर्फे अखंड भजनाचा कार्यक्रम होईल.
भजन सप्ताहाची सांगता मंगळवार 23 रोजी दुपारी होईल. दोन दिवस उत्साहात साजरा होणाऱया सप्ताह उत्सवात सर्वांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहाण्याची विनंती देवस्थान समितीतर्फे करण्यात आली आहे.