प्रतिनिधी /खानापूर
जांबोटी बसस्थानकाजवळ मोठा ट्रक दुसऱया वाहनाला बाजू देताना रस्त्याकडेला गेल्याने कलंडला होता. त्यामुळे बेळगाव-गोवा रस्त्यावर जांबोटी बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला रविवारी सायंकाळी तासभर वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. खानापूर पोलिसांनी तात्काळ पेन मागवून हा ट्रक रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली. वाहतूक सुरळीत करत असतानाच कुसमळी पुलावर पुन्हा एक टेम्पो बंद पडल्याने एक तास वाहतूक खोळंबली. जांबोटी येथील कार्यकर्त्यांनी ही वाहतूक मोकळी करण्यासाठी प्रयत्न केले व एकेरी वाहतूक सुरू केली. त्यामुळे वाहतूकदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
जांबोटी येथील तरुणांच्या सहकार्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. कुसमळी येथील पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. हा पूल केव्हा कोसळेल याचा नेम नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते याकडे डोळेझाक करत आहे. हा पूल पूर्णपणे कमकुवत बनला असून या पुलावरून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक होत असताना संबंधित खाते झोपा काढत आहे काय असाही प्रश्न येथील नागरिक करत आहेत. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून लहान वाहने पुलावर अडकून पडत आहेत. याबाबत बांधकाम खाते तसेच रस्ते प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.