सावंतवाडी / प्रतिनिधी –
सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाचे नेते विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम येत्या शनिवार दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आर पी डी हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
शिवसंग्रामचे नेते मा. आम. विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नियोजन बैठक सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या उपस्थित आर पी डी हायस्कूल येथे घेण्यात आली. यावेळी विकासभाई सावंत,सौ अर्चना घारे परब,लक्ष्मण नाईक, पुंडलिक दळवी, विलास जाधव, शिवप्रसाद देसाई ,विजय देसाई, ॲड संतोष सावंत सौ दर्शना बाबर देसाई, व इतर उपस्थित होते .