ट्रकचे ८ ते १० लाखाचे नुकसान
कळे/प्रतिनिधी
गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरती कळे येथे मोटर अपघात होऊन ट्रकचे ८ ते१oलाखाचे नुकसान झाले. याबाबतची वर्दी चालक सुरेश किसन राठोड (मु. जांभळवाडी, पो. कासार्डे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांनी कळे पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सुरेश राठोड.अशोक लेलैंड ट्रक नं. (एमएच ०७, जे. ०७७३) हा वाळू भरून वैभववाडी कासार्डे ता.कणकवली येथून गगनबावडा मार्गे इचलकरंजीला जात असताना कळे (ता.पन्हाळा) या ठिकाणी दस्तुरी चौकाच्या अलीकडे शुक्रवार दि. २२ रोजी सकाळी ५.३० वा. च्या सुमारास ब्रेकफेल होऊन स्टेअरिंग लॉक होऊन ताबा सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूस १० ते १५ फुट खाली ऊसाच्या शेतात वाळूसहित उलटला झाला. चालक ट्रकच्या बाहेर फेकला गेल्याने किरकोळ जखमी झाला आहे. घटनास्थळी कळे पोलिस दाखल होऊन मदतकार्य केले. मोटर अपघात अशी नोंद करण्यात आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचे सुमारे ८ ते१०लाखाचे नुकसान झाले आहे