कोबी ही अत्यंत पौष्टिक पालेभाजी आहे. अनेक जणांना कोबी आवडतो तर बऱ्याच जणांना वासामुळे हि भाजी आवडत नाही. पण तुम्ही कोबीपासूनस्वादिष्ट पकोडा बनवला तर सर्वचजण आवडीने खातील. हा पकोडा तुम्ही कधीही सहज तयार करू शकता. जाणून घेऊया काय आहे त्याची रेसिपी.
साहित्य
कोबी
१ चमचा बेकिंग सोडा
तेल
२ चमचा आमचूर पावडर
२ चमचा लाल तिखट
हळद
पाणी
दीड कप बेसन
मीठ
कोबीचे पकोडे बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी नीट धुवून बारीक चिरून घ्या. आणि स्वच्छ धुवून घ्या.आता पकोड्यांचे पीठ बनवण्यासाठी प्रथम एक भांडे घेऊन त्यात चिरलेला कोबी बेसन, मीठ, १ चमचा तेल, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, खाण्याचा सोडा घालून सर्व साहित्य एकत्र करून हळूहळू पाणी घाला.आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिठात थोडासा ओवा देखील घालू शकता. पकोडे बनवण्यासाठी प्रथम एक पॅन मध्यम आचेवर गरम करा आणि त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात भजी सोडा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. एका प्लेट मध्ये टिश्यू पेपर ठेवून त्यावर पकोडे काढा आणि हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरम चहा बरोबर सर्व्ह करा.
Previous Articleअँटी करप्शनचे अधिकारी असल्याचे भासवत लुटमार
Next Article केसांच्या समस्या जाणवताहेत?मग हा शॅम्पू बदलून पहा
Related Posts
Add A Comment