साहित्य
१ वाटी मुगडाळ
पालकाची एक जुडी
५ ते ६ हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आले
६ ते ७ लसूणच्या पाकळ्या
अर्धा चमचा ओवा
बारीक चिरलेला एक कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
पाव चमचा हळद
चिमूटभर हिंग
एक चमचा तीळ
२ चमचे तांदळाचे पीठ
१ चमचा बेसन
मीठ
कृती
मुगडाळ आणि पालकाची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मुगडाळ १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावी. यांनतर डाळीमधील पाणी काढून सर्व मिक्सरमध्ये डाळ,आले ,लसूण आणि मिरचीचे वाटण करून घ्यावे.यानंतर हे वाटण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. आता यामध्ये चिरलेला पालक, ओवा ,हिंगआणि हळद घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.यानंतर त्यामध्ये चविनुसार मीठ ,तीळ, तांदळाचे आणि बेसन पीठ घालून पीठ पुन्हा एकत्र करून घ्या.आणि गॅसवर तेल गरम करून चमच्याने किंवा हाताने भजी मंद आचेवर तळून घ्या. तयार झालेली गरमागरम भजी सॉस,चटणी किंवा संध्याकाळच्या चहासोबत सर्व्ह करा.
Previous Articleमाझ्यावर भाडोत्री व्यक्तींकडून पाळत; घातपाताचा संशय
Next Article बारावीची परीक्षा उद्यापासून
Related Posts
Add A Comment