दोन महिन्यात सहा मृत : आता 18 चित्ते शिल्लक
वृत्तसंस्था /कुनो
कुनो नॅशनल पार्कमध्ये गुऊवारी ‘ज्वाला’ चित्त्याच्या आणखी दोन पिल्लांचा मृत्यू झाला. मंगळवारी एका चित्त्याच्या पिलाचा मृत्यू झाला होता. दोन महिन्यात आतापर्यंत सहा चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वप्रथम 26 मार्च रोजी मादी चित्ता ‘साशा’चा मृत्यू झाला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी चित्ता ‘उदय’, 9 मे रोजी मादी चित्ता ‘दक्ष’, 23 मे रोजी ‘ज्वाला’चे एक शावक आणि 25 मे रोजी ‘ज्वाला’ चित्त्याचे आणखी दोन शावक मरण पावले. एकंदर गेल्या दोन महिन्यांत तीन प्रौढ आणि तीन शावकांसह 6 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. कुनोमध्ये पहिल्या खेपेत 8 चित्ते नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना बंदिवासात सोडण्यात आले. यानंतर 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्त्यांना कुनो येथे आणण्यात आले. त्यानंतर आता कुनो नॅशनल पार्कमध्ये फक्त 18 चित्ते उरले आहेत. मादी चित्ता ‘ज्वाला’ने 27 मार्च रोजी चार शावकांना जन्म दिला होता.