वृत्तसंस्था/ सिलेत
आयर्लंडचा क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आला असून उभय संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 27 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी घोषित करण्यात आलेल्या 14 जणांच्या बांगलादेश क्रिकेट संघात रिशाद हुसेन आणि जाखड अली अनिक या दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
तीन सामन्यांची टी-20 मालिका चेतोग्राममध्ये खेळवली जाणार असून पहिला सामना 27, दुसरा 29 तर तिसरा सामना 31 मार्चला होणार आहे. बांगलादेशच्या टी-20 संघाचे नेतृत्व शकीब अल हसनकडे सोपवण्यात आले असून अफिफ हुसेन आणि नुरुल हसन यांना मात्र संघातून वगळण्यात आले आहे.
बांगलादेश संघ- शकीब अल हसन (कर्णधार), लिटॉन दास, रोनी तालुकदार, नजमूल हुसेन शांतो, रिदॉय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, नेसूम अहमद, मुस्ताफिजूर रेहमान, हसन मेहमूद, तस्कीन अहमद, शोरीफुल इस्लाम, रिशाद हुसेन, आणि जाकर अली अनिक.