उबर ईव्ही कंपन्यांसोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत :
नवी दिल्ली
अॅप-आधारित कॅब सेवा देणारी कंपनी उबरने भारतातील विविध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आणि इतर संस्थांसोबत करार करण्याची घोषणा केली आहे. उबेरने बुधवारी सांगितले की ते आपल्या भागीदारांना ग्रीन ट्रान्स्पोर्टेशनमध्ये बदलण्यास मदत करू इच्छित आहे.
कंपनीने ईव्ही फ्लीट पार्टनर्स लिथियम अर्बन टेक्नॉलॉजीज, एव्हरेस्ट फ्लीट प्रायव्हेट लिमिटेड आणि मूव्ह सोबत आपली भागीदारी केलेली असून पुढील दोन वर्षांत उबेर प्लॅटफॉर्मवर 25,000 इलेक्ट्रिक कार उपलब्ध होणार असल्याचे समजते. याशिवाय, उबरने 2024 पर्यंत दिल्लीत 10,000 ईव्ही दुचाकींसाठी जीप इलेक्ट्रिकशी भागीदारी केली असल्याची माहिती आहे.
1,000 कोटी रुपयांची करणार उभारणी
ईव्ही निधीसाठी 1,000 कोटी रुपये उभारण्यासाठी कंपनीने सिडबीशी हातमिळवणी केली आहे. उबरने सांगितले की ते बीपी सोबतची जागतिक भागीदारी जिओ व बीपीच्या माध्यमातून भारतात करत आहे. याशिवाय, उबेरने इलेक्ट्रिक वाहनांच्या जलद चार्जिंगसाठी जीएमआर ग्रीन एनर्जीशी करार केला आहे.
जूनपासून उबर ग्रीन
हरित वाहतुकीच्या दिशेने वाटचाल करताना, सॅन फ्रान्सिस्कोस्थित कंपनीने जूनपासून दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथे ‘उबर ग्रीन’ ही योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
मॅकडोनाल्ड, उबेरचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मोबिलिटी अँड बिझनेस ऑपरेशन्स) म्हणाले, ‘भारताचा विद्युतीकरणाचा वेग हा उबरसाठी प्राधान्य देणारा ठरतो कारण आम्ही 2040 पर्यंत आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक व्यक्तीला इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता पूर्ण करत असल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले आहे.